Press "Enter" to skip to content

भाजपा दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी दहीहंडीवरून साधला सरकारवर निशाणा

राज्‍य सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे : महेश मोहिते

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. दहीहंडी साजरा करण्यासंदर्भात शासनाने सार्वजनिक दहीहंडी साजरी करू नये असे आदेश दिले आहेत. पण, ठाकरे सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी अलिबाग येथे दहीहंडी साजरी करण्यावरून सरकारवर निशाणा साधला.

भारतीय जनता पक्षाने शासनाचे निर्बंध झुगारून अलिबाग येथे दहीहंडी फोडली. दहीहंडी साजरी करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरवले होते. सगळे सण साजरे केले पाहिजेत. शिवसेना विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं? सरकार सोयानुसार निर्बंध लावत आहे.असेही मोहिते यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.