Press "Enter" to skip to content

श्रावणी सोमवार निमित्ताने माथेरान येथे महापूजेचे आयोजन

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

श्रावणी सोमवार निमित्ताने येथील संत गाडगे महाराज रोड रेल्वे स्टेशन परिसरातील प्रति पिसारनाथ महाराज मंदिरात अभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण विद्यमान नगरसेवक संदीप नारायण कदम यांच्या प्रयत्नातून झाले असून रेल्वे स्टेशन लगत असल्याने याठिकाणी पर्यटक सुध्दा आवर्जून भेट देत असतात.

महापूजेचे औचित्य साधून या प्रभागातील नगरसेविका
(शिक्षण सभापती ) प्रतिभा घावरे यांनी मुलांना खेळाचे साहित्य (कॅरम,क्रिकेटचे साहित्य,बॅटमिंटन , बुद्धिबळ) देण्यात आले.

या वेळी श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी माथेरान नगरपरिषदेचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष आकाश चौधरी , नगरसेवक चंद्रकांत जाधव,माजी नगरसेवक प्रदिप घावरे ,नगरसेवक संदीप कदम व माजी नगरसेवक अरविंद शेलार सामाजिक कार्यकर्त्या अमृता कदम व सुवर्णा कदम यांसह अन्य स्थानिक रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.