सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कै.नारायण उलवेकर गुरुजींनी रसायनीतील वावेघर जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाची सेवा करुन रसायनी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले.यातील अनेक विद्यार्थी समाजामध्ये विविध तसेच वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांत ज्ञानदानाचे कार्यंशिक्षक म्हणून ओळख आहे.तसेच खालापूर तालुक्याचे विस्तार अधिकारी असताना अनेक प्रकारचे सेवाभावी उपक्रम कै.सालवेकर गुरुजींनी राबविले.
रसायनीतील वावेघर शाॅपिंग सेंटरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करुन ते तेथील सर्वधर्मीय समाजामध्ये एकात्मता वाढविण्याचे कार्यं केले.तसेच नोंदणीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून परिसरातील लोकांना औषधोपचार करून त्यांचे आरोग्य सुधारण्याचे कार्यं करुन आजारातून मुक्त केले.ते नेहमी रसायनी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असत.कै.नारायण उलवेकर यांचे निधन झाल्याने रसायनीत शोक व्यक्त केला जात आहे.








Be First to Comment