Press "Enter" to skip to content

शिवशंभू प्रतिष्ठान वतीने मेढा ग्रामपंचायतमध्ये तोफगाडा लोकार्पण सोहळा

सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे/उदय मोरे |

छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याच्या कार्यासाठी झिजलेल्या मेढा रोहा येथील तोफेस तोफागाड्याचा साज चढवून गत वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प शिव शंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी करून प्रत्येक्षात त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड संकल्प २०२०-२१ पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान प्रतिष्ठानच्या मावळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते २९ तारखेला प्रतिष्ठानच्या वतीने मेढे (अवचितगड) गावात बिटंबनेचा भाग बनलेल्या तोफेस पुन्हा तोफागाड्याचा साज अर्पण करून स्वराज्या संकल्पनेस साजेल असे काम केले आहे.

त्या लोकार्पण सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सेनेदलातून निवृत्त झालेले सैनिक सौरभ सुदाम खांडेकर , युवा नेते महेंद्र खैरे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा थाटात पार पडला माझी सभापती लक्षुमन महाले वन विभाग अधिकारी तेजस नरे मेढा हायस्कुल चेअरमन भगवान गोवर्धन , तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर , उपसरपंच उदय मोरे शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे
माजी सरपंच संतोष सुतार , ज्ञानदेव शेलार माजी उप सरपंच नंदकिशोर दाइटकर दिनेश घरट नारायण मांडवकर ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जाधव प्रभाकर दाइटकर विजय मोरे जितेंद्र जाधव शरद गोवर्धने राकेश गोवर्धने छगन लाड नथुराम सकपाळ भगवान गोवर्धने संजय बिर्जे शुभम उंबरे सुदाम खांडेकर नथुराम महाले ग्रामपंचायत सदस्य सेजल उंबरे ज्ञानेश्वरी गोवर्धने समीक्षा जवके मनाली मोहिते रागिणी गोवर्धने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे ,बर्डे , अमरदीप म्हात्रे सर , राकेश महामुनी राज म्हसकर विश्वास सानप श्रीकांत जंगम आशिष थोरवे सुशील घाटवळ देवेंद्र जुईकर अस्मिता महाडिक योगेश मालुसरे हेमंत मालुसरे मंदार जाधव सुनील इंगवले मयू कापसे प्रदीप जोशी सर देविदास बामुगडे आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी व गड प्रेमी उपस्थित होते .

यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद असून तरुणांमध्ये ऐतिहसिक भावना जागृत करणारे आहे . असे गौरव उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले . प्रतिष्ठानच्या सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे वतीने व सरपंच उदय मोरे यांनी स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रतीक पाटणकर आभार विशाल तेलंगे यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.