अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचे शासन स्थरावरील प्रश्न व समस्यां सोडविणार : पालकमंत्री आदिती तटकरे
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
कोरोनाच्या जैविक महामारी व अतिवृष्टीसह महापूर आदी संकटात स्वतःचा जिव धोक्यात घालून आपले कर्तव्ये बजावणाऱ्या शासकीय कर्मचारी व शासनातील विविध घटक समूहाने मोलाची कामगिरी केली. त्यांचे कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असल्याचे पालकमंत्री तटकरे म्हणाल्या. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांचे शासन स्थरावरील प्रश्न व समस्यां सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. जन हिताची भावना मनात ठेवून आपण जे योगदान देत आहेत, त्या कृतीला योग्यशिर न्याय देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल असे पालकमंत्री तटकरे म्हणाल्या.
रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून संकट काळात झोकून देऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आदी घटकांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
यापुढे अशा प्रकारच्या आपत्तीत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या विजवीतरण कर्मचारी आदींसह विविध घटक समूहांना जीवनावश्यक साहित्य वाटप करून आधार देण्याचे काम केले जाणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

यावेळी आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा महिला सौ प्रतिमा ताई जाधव , तालुकाध्यक्ष वाय.सी. जाधव, शहराध्यक्ष अजित खेडेकर, विभाग प्रमुख बारकू शिंदे, विठोबा पार्टे, श्री करंजे , महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, शिरगाव सरपंच सचिन ओझर्डे, संतोष देशमुख , चंद्रकांत बुवा जाधव, युवक जिल्हाउपाध्यक्ष सोनल उतेकर, महाड शहर अध्यक्ष राकेश शहा, युवा नेते अभंग जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.









Be First to Comment