सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कर्तव्य निष्ठ व कर्तव्य पूर्ती करणारे अधिकारी असल्यास आम्हा लोकप्रतिनिधीना प्रशासनात काम करणे सोपे जाते,दोन्ही अधिकारी यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांची उकल होण्यास साहाय्य झाले,असे उदगार सभापती वृषाली पाटील यांनी काढले.
खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांची बदली पनवेल व सहा. गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांची बदली महाड येथे झाल्याने खालापूर पंचायत समिती, अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने शाल,श्रीफळ, भेटवस्तू देऊन निरोप समारंभ पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी सभापती बोलत होत्या.
प्रशासनातील जाण, कर्तव्य करणाऱ्या अधिकारी यांची नेहमीच आठवण येईल असे उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. माझ्या कार्यकाळात नेहमीच मार्गदर्शन व चांगला सल्ला देऊन प्रशासनातील माहिती मिळाली असे माजी सभापती सौ.कांचन पारंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
विस्तार अधिकारी एम.जी.शिंदे,शैलेश तांडेल,राजाराम मोरे, अधीक्षक सौ.पुरी,कार्यालयातील तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, शिपाई यांनीही आपले मनोगत व्यक्त करून दोन्ही अधिकारी यांच्या सौजन्य व मार्गदर्शनाची आठवण करून दिली.
वेगवेगळ्या स्थरावर चौदा वर्षे खालापूर पंचायत समितीचे आपण काम केले असून सर्वांनीच प्रेम व सहकार्य केले आहे, असे भावपूर्ण मनोगत भाऊसाहेब पोळ यांनी व्यक्त केले.खालापूर तालुक्यातील जनतेने,लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने आपण तालुक्यातील जनतेचे प्रस्ताव मंजूर करून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे,खालापूर तालुक्याची आठवण नेहमीच राहील असे भावपूर्ण उदगार गटविकास अधिकारी संजय भोये यांनी काढले.
दोन्ही अधिकारी यांच्या कार्यकाळात यशवंत पंचायतराज अभियान, महाआवास योजना,स्वच्छ भारत मिशन,१००% नळ कनेक्शन, ई. कार्यक्रमात सहभागी होऊन पारितोषिक मिळाले आहे.कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,अभियंता, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन एम.जी. शिंदे,आभारप्रदर्शन कार्यालय प्रमुख चोपडे यांनी केले.








Be First to Comment