सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
वंचित बहुजन आघाडीत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपरिषद हद्दीत बामचा मळा येथे शाखेचे उदघाटन करण्यात आले, याप्रसंगी अनेकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होवुन आज नगरपरिषद हद्दीत कर्जत- बामचा मळा येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात अनेकांनी पक्षात प्रवेश केला. तसेच याप्रसंगी बामचा मळा येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश नेते दिपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी शाखा कमिटी निवडण्यात आली शाखाध्यक्ष म्हणुन चंद्रकांत कल्लीपार, सचिव इश्वर वाघरे, कोषाध्यक्ष अमोल घाडगे यांची निवड करण्यात आली. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, कमलाकर जाधव, राजु ढोले, अनिकेत गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कृष्णा कांबळे,नितेश देशमुख, राहुल दुटचंडकी,हर्ष कल्लीपार, ऋषिकेश जंजिरेकर,साहिल देशमुख, रमेश परमार,रिचल्ड रोड्रिंक्स,आनंद नागरीकर,दिनेश चव्हाण,दत्ता नागटीलक,रामू सिंग,गणपत राठोड, अशोक धडमनी,रवी चव्हाण,सोनल कांबळे,योगिता कांबळे,निशा रोडिक्स, अनिता नागटीलक,नागम कल्लीपार, रिहिनी नागटीलक,हसीना शेख,पूजा सिंग,रेणुका दडमनी,सुनीता सारवडे, आशा जिंगे,वैशाली कल्लीपार,पूजा घाडगे आदीनी प्रवेश केला आहे.








Be First to Comment