सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आताच्या घडीला बहुतांशी तरुण गाजावाजा व धुमधडाक्यात वायफळ खर्च करून आपला वाढदिवस मौजमजा करीत साजरा करतात, परंतु काही जण याला अपवाद ठरत असून अनेक सामाजिक उपक्रम हाती आपला वाढदिवस साजरा करित असताना आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी – युवानेते रोहित चंद्रकांत विचारे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधीलकी जपत साजरा केला.
यादिवशी खालापूरातील ग्रामीण करंबेळी ठाकूरवाडीत स्वखर्चाने 5000 हजार लिटर पाण्याची टाकी देत येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने सर्व आदिवासी – ठाकूर समाज बांधव आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. युवानेते रोहित विचारे हे कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असल्याने खालापूर तालुक्यातील आमदार थोरवे यांचे बहुतांशी काम हे रोहीत विचारे हे मार्गी लावत असतात.

आमदार थोरवेंनी दिलेली जबाबदारी रोहित विचारे पार पाडत असताना सामाजिक बांधीलकीचे भान मनात ठेवत विचारे हे सामाजिक कार्य सुध्दा तितक्याच जोखमीने पार पडत असून युवानेते रोहित विचारे यांनी 27 अॉगस्ट रोजी आपल्या वाढदिवसादिनी वायफळ खर्च न करता तोच खर्च समाज कार्यासाठी वापरत खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडीमधील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने 5000 हजार लिटर पाण्याची टाकी देत येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करीत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरी केल्याने करंबेळी ठाकूरवाडीतील बांधवाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर युवानेते विचारे यांच्या कार्याचे ग्रामस्थांनी तोंडभरून कौतुक करीत रोहित विचारे यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment