माथेरान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप, आधार कार्ड शिबिराचे आयोजन
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान या छोट्याशा गावात आजही अनेक समस्या तशाच प्रलंबित आहेत. सर्वसामान्य लोकांना त्याचप्रमाणे पर्यटकांना भेडसावत असलेल्या वेगवेगळ्या समस्या निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप त्याचबरोबर आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रशांत ठाकूर बोलत होते.एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात व्यासपीठावर मा.श्री.प्रशांतदादा ठाकूर (आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रायगड ) मा.श्री.महेशजी बालदी (आमदार उरण विधानसभा मतदारसंघ ) मा.श्री.मंगेशदादा म्हसकर (कर्जत तालुका मंडल अध्यक्ष तथा सदस्य नेरळ ग्रामपंचायत ) व मा.श्री.किरण ठाकरे ( उद्योजक कर्जत ),माथेरान नगरपालिका उप नगराध्यक्ष आकाश चौधरी आदी उपस्थित होते.

माथेरान मधील अनधिकृत झोपडपट्टी कशाप्रकारे लवकरात लवकर अधिकृत करता येईल त्याचप्रमाणे पर्यटकांना स्वस्त आणि सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक वेहीकल्स असुद्या, तरूणां रोजगारासाठी व्हॅली क्रॉसिंग, रेल्वेच्या मालवाहतूक सेवेबाबत आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत.विशेष म्हणजे राजकीय भिंती बाजूला ठेवून भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे तसेच मनसे अध्यक्ष संतोष कदम यांनी उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचेही ठाकूर यांनी मनापासून आभार व्यक्त केले.यावेळी मा.श्री.महेशजी बालदी (आमदार उरण विधानसभा मतदारसंघ ) यांनीही आपले अनमोल विचार यानिमित्ताने व्यक्त केले.या वेळी अनेकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
विलास पाटील ( अध्यक्ष ), शैलेंद्र दळवी (उपाध्यक्ष ), सुभाष भोसले ( उपाध्यक्ष ) , संपत दरेकर सर (सचिव ) , संजय भोसले ( सचिव ), संध्या शेलार ( महिला अध्यक्षा ), बाबू बर्गे ( अध्यक्ष युवा मोर्चा ) तसेच भाजपचे सर्व सन्मा.नगरसेवक / नगरसेविका ,आजी ,माजी पदाधिकारी, युवा मोर्चा ,आणि महिला आघाडी उपस्थित होते.








Be First to Comment