सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या माध्यमातून पोलीस ठाणे अंतर्गत अपघात प्रमाण कमी करणे तसेच अपघात होणार नाही तसेच रस्ता सुरक्षा,रस्ते दुरुस्ती उपाययोजना संदर्भात मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत खालापूर पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत रस्ते विकास महामंडळ अधिकारी व कंत्राटदार यांना योग्य प्रकारे रस्त्यांच्या संदर्भात नियोजन करावे,सुसज्ज रस्ते विकसित व्हावेत, तसेच अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दिलीप शंकरवार,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ उपअभियंता प्रेरणा कोटकर,कैलास पाटील,आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.एम एस गांधी,अभय पावस्कर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी, एकनाथ पिंगळे,प्रितेश मोरे,भाऊ सणस,चिंतामण चव्हाण,सामजिक कार्यकर्ते मनीष खवळे,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अनंत ठोंबरे या बैठकीत उपस्थित होते.

यानंतर माजी आमदार मनोहर भोईर यांनी मु़ंबईं पुणे जुन्या महामार्गावरील काही अपघात क्षेत्रांची पाहणी केली. प्रवाशाचा जीव वाचावा, अपघात होवू नये,या रस्त्यावरून जाणारा प्रवासी सुखात जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून भविष्यात या रस्त्याची समस्या न सुटल्यास रस्त्यावरील टोल कायमचा बंद करू असा इशारा माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी दिला आहे.








Be First to Comment