सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत शहरातील मोहन ओसवाल यांनी आपला अमृत महोत्सवी 75 वा वाढदिवस एका शाळेतील 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी भरून साजरा केला.
कर्जत महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर शाळेत अनेक गरीब मुले शिक्षण घेत आहेत. काही हुशार विद्यार्थ्यांचे पालक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे फी भरू शकत नाहीत. त्यांचे शिक्षण व्हावे यासाठी कर्जत शहरातील मोहन केसरीमल ओसवाल यांनी आपला 75 वा वाढदिवस अत्यंत साधे पणाने करण्याचे ठरविले. विद्या विकास मंदिर या शाळेतील कु. प्रगती दीपक सरावते, कु. दिव्या सुनील दुर्गे, कु. जयेश सुभाष जाधव, कु. सार्थक पांडुरंग ढोले, कु. सानिया दस्तगिर सय्यद या दहावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षाची फी भरली. फी च्या रकमेचा धनादेश ओसवाल यांनी संस्थेच्या मीना प्रभावळकर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, पर्यवेक्षिका श्रद्धा मुंढेकर उपस्थित होत्या.
प्रभावळकर यांनी, ‘आमच्या शाळेत गरीब विद्यार्थी शिकतात. त्यांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. अनेक दानशूर व्यक्ती त्यांची फी भरण्यासाठी पुढे येतात म्हणूनच आम्ही या मुलांना शिकवू शकतो.’ असे स्पष्ट केले. ओसवाल यांनी, ‘माझा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करावा असे कुटुंबीय आणि माझ्या मित्र मंडळीने केले होते मात्र मी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले आणि ते प्रत्यक्षात उतरविले.’ असे सांगितले.








Be First to Comment