Press "Enter" to skip to content

शिहू बेणसे विभागातील जनतेला विजवीतरण चा वाढीव विजबिलांचा शॉक

विजवीतरण चा अजब गजब कारभार, ग्राहकाला थोपवले 51 हजार 720 रुपयांचे वीजबिल, मोहन पाटील यांचा आहत्येचा इशारा

सिटी बेल | बेणसे | रायगड |धम्मशील सावंत |

कोरोना काळात जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत असलेल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला वाढीव वि बिलांच्या समस्येने ग्रासले आहे. शिहू बेणसे विभाग वाढीव विजबिलानी हैराण झाला आहे. ग्राहकांच्या माथी अंदाजे व मोठ्या  रकमेची वाढीव बिले मारली जात आहेत. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. शिहू येथील ग्राहक मोहन पाटील यांना   तब्बल 51 हजार 720 रुपयांचे वीज बिल आल्याने त्यांना चांगलाच शॉक बसला आहे. वीजबिल तात्काळ भरण्याची सक्ती केली जात आहे. वीज बिल भरण्यास विलंब झाल्याने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. विजवीतरण च्या अजब गजब व गलथान कारभाराला कंटाळून शेतकरी असलेल्या मोहन पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे.

मोहन पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळात आम्ही नित्यनेमाने वीज बिल भरत आलो आहोत. मात्र मीटर वरून रिडींग न घेता अंदाजे विशिष्ट रक्कम ग्राह्य धरून त्या नुसार वीज बिल दिले जात आहे. सरासरी वीज बिलांच्या दुप्पट व चार पट वीज बिलाची रक्कम येऊ लागल्याने कोरोना महामारीत ही बिले कशी भरणार असा सवाल संतप्त ग्राहकांनी उपस्थित केलाय. मोहन पाटील यांनी आपली चीड व्यक्त करताना म्हटले कोरोना काळात रोजगाराचे साधन नाही, खावे काय जगावे कसे, कुटुंबाला कसे जगवावे कसे याची भ्रांत पडली आहे, अशात ही वाढीव बिले व विजवीतरण विभागाकडून होत असलेला मानसिक शारीरिक छळ सहन होत नाही. वैफल्यग्रस्त स्थिती त आता आत्महत्त्या करण्याशिवाय पर्याय नाही.

वाढीव वीज बिलाची ओरड एक दोन ग्राहकांची नाही तर शेकडो ग्राहक, सर्वसामान्य गोरगरीब विजवीतरण विभागाच्या मनमानी व हंम करे सो या जुलमी कारभाराला बळी पडले आहेत. सक्ती, धपट शाही यामुळे नागरिक तणावात आहेत. विजेसाठी विजवीतरण शिवाय अन्य पर्याय नसल्याने हुकूमशाही केली जात असल्याचा संताप नागरिक व्यक्त करतायेत.

बेणसे सिद्धार्थनगर येथील उत्तम सावंत यांनी देखील विजवीतरण च्या मनमानी कारभाराचा समाचार घेतला आहे. कार्यालयात बसून सरासरी वाढीव वीज बिलाची रक्कम आकारून ती तात्काळ भरण्याची सक्ती होतेय. मागील पाच सहा महिन्यात 160 रुपया प्रमाणे अंदाजे रिडींग टाकून बिल दिले जात आहे. 

विद्युत देयके भरा अन्यथा वीज कापू अशी तंबी दिली जातेय. कोरोना काळात नोकरी धंदा नाही, घरात केवळ दोन पंखे व दोन ब्लब आहेत. इतर उपकरणे नसताना आलेली भरमसाठ बिले भरणार कशी? कोरोना काळात नोकरी धंदे बंद आहेत, जगावे कसे हा प्रश्न पडला आहे, माननीय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी  या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी केलीय.

शिहू येथील कृष्णा भोईर याने देखील कोरोना काळात अन्यायकारक बिले येतात, भरणार कशी असा सवाल उपस्थित केलाय.  विजवीतरण कार्यालयात नागरिकांना इतके बिल आहे ते काही करून भरावेच लागेल असे सक्तीने सांगितले जात असल्याने जनतेत विजवीतरण विरोधात प्रचंड असंतोष दिसून येतोय. दरम्यान ग्राहकांनी तक्रारी अर्ज भरून दिल्यास त्यांचे समाधान होईल अशा प्रकारचे सहकार्य आमच्याकडून केले जाईल असे विजवितरण पेण येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.