Press "Enter" to skip to content

नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यासाठी कायमचा उपाय अमलात आणा

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांची अधीक्षक अभियंत्यांकडे आग्रही मागणी

सिटी बेल | नवीन पनवेल |

नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पडणारे खड्डे म्हणजे, नेहमीची येतो मग पावसाळा आणि नागरिकांच्या यातनांना येतो उमाळा! अशी परिस्थिती झाली आहे. नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकांच्या रस्त्यांवर काँक्रिटीकरण करणे हाच त्यावर कायमचा उपाय असल्याचे असल्याचे सांगत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी ते काम तातडीने झाले पाहिजे या स्वरूपाचे निवेदन सिडकोचे अधीक्षक अभियंता यांना दिले.    

याबाबत अधिक माहिती देताना माजी नगराध्यक्ष संदीप पाटील म्हणाले की, नवीन पनवेल उड्डाणपूल रस्त्यावर प्रचंड रहदारी वाढली आहे. पावसाळ्यात या उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकांकडे खड्ड्यांचे साम्राज्य माजते. प्रत्येक वर्षी खड्डे बुजवण्याची निवेदने दिली जातात आणि त्यावर थातुरमातुर अशी खड्डे बुजवण्याची कारवाई होते. परंतु असली तात्पुरती थुकपट्टी करण्यापेक्षा या दोन्ही टोकांकडे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाला जिथे उड्डाणपुलाचा रस्ता मिळतो त्याठिकाणी आणि नवीन पनवेल येथे एचडीएफसी बँकेच्या समोरील सर्कलवर काँक्रिटीकरण करणे हाच कायमचा उपाय आहे. आज या उड्डाणपुलाला पडलेले खड्डे व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे नवीन पनवेल मध्ये प्रवेश करणे आणि नवीन पनवेल मधून बाहेर पडणे ही नागरिकांच्या साठी एक डोकेदुखी ठरत आहे.

आम्ही दिलेल्या निवेदनाकडे सिडकोचे अधीक्षक अभियंते यांनी सकारात्मक दृष्टीने पाहत तातडीने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी चे काम हाती घेतले असून तशा स्वरूपाचा प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू झाले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की नजीकच्या काही दिवसात या खड्ड्यांवरचा कायमचा उपाय म्हणजे काँक्रीटीकरण ही प्रक्रिया सुरू होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.