सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील बाहे गावातील शेतकऱ्याचा उमदा बैल सर्पदंशाने दगावला असल्याने शेतकऱ्यावर फारच मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाहे गावातील विलास तुकाराम निकम यांच्या गोठ्यात बांधलेल्या त्यांच्या शेतीचे कामासाठी व बैलगाडीचे कामासाठी उपयुक्त असणाऱ्या बैलजोडीपैकी एका बैलास सोम.दि.२३ आँगस्ट रोजी सकाळच्या सुमारास सर्पदंश होऊन बैल दगावल्याने विलास निकम यांच्यासमोर फारच मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
शेतीचे कामासाठी व बैलगाडीचे कामासाठी उपयुक्त असणारा बैल सर्पदंशाने एकाकी दगावल्याने विलास निकम हे हवालदिल झाले असून त्यांच्यावर कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.
विलास निकम हे बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जातात. उन्हाळी हंगामात आपल्या शेत जमिनीत भाजीपाला लागवड तर पावसाळी हंगामात भातशेतीची लागवड करून आपला उदरनिर्वाह त करीत आहेत. या सर्व कामासाठी त्यांना आपल्या बैलजोडीचा मोठाच हातभार लागत असल्याने व सर्पदंशाने एक बैल दगावल्याने त्यांच्यासमोर मोठेच संकट उभे राहिले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित प्रशासन यंत्रणेने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विलास निकम यांना नवीन बैल खरेदी करण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त आर्थिक हातभार लावून सहाय्य करावे. अशाप्रकारची मागणी अन्य शेतकरी वर्गाकडून केली जाऊ लागली आहे.








Be First to Comment