सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील दामिनी स्वयं – सहाय्यता महिला समुहाच्या क्रियाशील अध्यक्षा सौ.विनिता विजय जंगम यांची महिला सुरक्षा संरक्षण तसेच अन्याय व अत्याचार विषयक वाचा फोडून आवाज उठविणाऱ्या महिला सुरक्षा संघटना – (महाराष्ट्र राज्य) रोहा शहर अध्यक्षा पदी विनिता जंगम यांची नियुक्ती करण्यात आली.
आजच्या एकविसाव्या शतकामधील संगणकीय युगातील महिला पूर्वी प्रमाणे चूल आणि मूल एवढ्या पूर्ता मर्यादित,अबला नारी राहिली नसून स्त्री – पुरुष समानतेमुळे तीला समान न्याय हक्क प्राप्त झाले असून शैक्षणिक, राजकीय सामाजिक,क्रीडा आदी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असून स्वयंपूर्ण व सक्षम नारी सबला बनली आहे .त्यांचे धैर्य व कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठीचे पाठबळ मिळावे तसेच कर्तव्य, जबाबदाऱ्या व अधिकार यांची जाणिव व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिला सुरक्षा ही अग्रगण्य संघटना महिलांविषयी चे कार्य,सामाजिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सहभाग,महिलांवरील न्याय अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार आदी विविध सामाजिक समस्यांचे निवारण करून त्यांचे समोपाचारिक पद्धतीने योग्य न्याय हक्क देण्याचे कार्य करणाऱ्या महिला सुरक्षा संघटना (महाराष्ट्र राज्य) कोकण विभागीय अध्यक्षा दिपीका दिपक चिपळूणकर यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील दामिनी स्वयं – सहाय्यता महिला समुहाच्या क्रियाशील अध्यक्षा सौ.विनिता विजय जंगम यांची महिला सुरक्षा संघटना रोहा शहर अध्यक्षा पदी निवडीचे नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत तालुका उपाध्यक्षा आरती कांबळे,सचिव सुरेखा शित्रे आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.








Be First to Comment