Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात कपड्यांच्या दुकानाला आग : साडे तीन लाखांचा माल जळून भस्मसात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील रविंद्र यशवंत गायकवाड यांच्या कपड्यांचा दुकानाला पहाटे अचानक आग लागून दुकानातील कपड्यांसह इतर सामान असे अंदाजे एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा माल आगीत जळून भस्मसात झाला असून कोणतीही जिवित हानी झाली नाही.

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत राहणारे रविंद्र यशवंत गायकवाड हे पहाटे पाच वाजता गाढ झोपेत असताना त्यांचा फोन खणाणला. त्यांच्या ओम मानसी लेडिज कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून धुर बाहेर पडत असल्याचे रस्त्यावरुन जाणा-या नागरिकांनी सांगितले.यावेळी रविंद्र गायकवाड आपल्या दुकानासमोर आले.आग आटोक्यात आणण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी मदत केली.

यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.हि आग दुकानात शार्टंसर्किट होवून लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकानातील आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील किमती कपडे, फर्निचर,सिलिंग,फॅन ,रोख 27 हजार रुपये,कपड्यांची बिल असे अंदाजे एकूण 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल आगीत जळून भस्मसात झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या आगीत कोणतीही मणुष्यहानी झाली नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.