प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन केले दहन
सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नारायण राणे यांचा मुरूड तालुका शिवसेनेकडून निषेध करीत अटक करण्याची मागणी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील महाड येथे भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वाद यात्रेमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करीत असताना नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले.त्यांच्या या विधानाने शिवसैनिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली.त्यामुळे मुरूड तालुका शिवसेनेतर्फे नारायण राणे यांच्या विरोधात मुरूड तहसीलदार कार्यलायात नायब तहसीलदार रवींद्र सानप,मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्याकडे निवेदन देत कारवाई करीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नारायण राणे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून बाजारपेठतील चौकात दहन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, महिला संघटिका शुभांगी करडे,मुरूड नगराध्यक्षा स्नेहा पाटील,उपनगराध्यक्षा नौशीन दरोगे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते,नगरसेवक, तसेच शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment