Press "Enter" to skip to content

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरावस्थेची किशोरभाई म्हात्रे यांनी केली पोलखोल

उपाययोजना न केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृह व लॅब ची दुरावस्था झाली असून याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करून प्रा. आ. केंद्राची झालेली दुरावस्था पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरावस्थेची किशोरभाई म्हात्रे यांनी पोलखोल केल्याने या दुरावस्थेवर लवकरच उपाययोजना न केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी किशोरभाई म्हात्रे यांनी दिला आहे.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृह व लॅबची सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणपतशेठ म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ पारंगे, विकी म्हात्रे, रोशन दाभाडे, र.य.पाटील(गुरुजी), राजेश गायकवाड , नजिर युनूस सय्यद , अनिकेत म्हात्रे, प्रल्हाद पारंगे, प्रकाश पारंगे, संदीप पाटील,मोरेश्वर म्हात्रे आदींनी पाहणी केली असता सभागृहाचा स्लॕब पुर्णपणे गळत असून लादीवर पाणी साचलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

लॅब मध्ये तर पाणी गळत असलेल्या ठिकाणी बालदी ठेवण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर येत आहे. याबाबत किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले की, या सभागृहाचा वापर विविध विषयांवरील मिटींगसाठी केला जात असतो. सद्य स्थितीत या सभागृहाचा वापर नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी केला जात आहे. नागोठणे विभागातील हजारो लोकांना या सभागृहात कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे .

या मतदार संघात जनतेचे नेतृत्व करण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांचे प्रा. आ. केंद्राच्या दुरवस्थांकडे लक्षच नाही की, जाणूनबुजून ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी टीका यावेळी किशोरभाई म्हात्रे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, नागोठणे विभाग विकासापासून वंचितच आहे. विभागात अनेक विकासकामे रखडलेली आहेत. मुख्य रस्ते ,एस.टी.स्टँड आवार, अंबा नदीवरील ४०० वर्षापूर्वीच्या वरवठणे पुलाचे नव्याने काम करणे, नागोठणे येथील तलावांची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रा सभोवतालचे वाॕल कंपाऊंड आदींसह नागोठणे विभागातील अनेक विकासकामे रखडलेली असल्याची माहिती शेवटी किशोरभाई म्हात्रे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.