प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
सिटी बेल| धाटाव | शशिकांत मोरे |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी याचा निषेध करत नारायण राणे यांना अटक करावी अशी मागणी करत विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. रोहा शिवसेनाही या प्रकरणी आक्रमक होत रोहा मध्येही नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे निवेदन प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांना मंगळवारी देण्यात आले.
रोहा शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांचे नेतृत्वाखाली यावेळी शहरप्रमुख दिपक तेंडुलकर, नगरसेविका समिक्षा बामणे, उपतालुका प्रमुख महादेव साळवी, युवा सेना तालुका अधिकारी राजेश काफरे,आदित्य कोंडाळकर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणात २३ ऑगस्ट पासून सुरु झाली. या यात्रेदरम्यान महाड येथील पत्रकार परिषदे मध्ये नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील शिवसैनिकांनी राणे यांचा निषेध करत त्यांना अटक करण्यात यावी यासाठी राज्यभर रान पेटविले आहे. रोहा शिवसेनेनेही नारायण राणे यांचा निषेध करत त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
शहरातील नगरपरिषद चौकात सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत नारायण राणे यांच्या विरोधी घोषणा देत त्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल त्यांचा निषेध केला. त्यानंतर रोहा प्रांताधिकारी व पोलीस निरिक्षक यांना निवेदन दिले.








Be First to Comment