Press "Enter" to skip to content

बारवई ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या सहकार्यामुळे बारवई ग्रामपंचायत हद्दीतील खोळंबलेल्या विकासकामांना अखेर मुहूर्त मिळाला.यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील बारवईं गाव व समतानगर येथे जिल्हा नियोजन सेस फंडातून हायमास्ट बसविण्यात आले.तसेच समतानगर गावात स्ट्रेट लाईट कामाचे उदघाटन करण्यात आले.

याअगोदर समतानगर गावात अंधाराचे साम्राज्य होते.समतानगर गाव प्रकाशमय व्हावा यासाठी सरपंच अॅड.नियती बाबरे व त्यांचे पती निलेश सुरेश बाबरे यांनी मोलाचे सहकार्य करुन समतानगर वासीयांना अंधारमुक्त केले.तसेच स्व:खर्चातून समतानगर येथे प्रवासी निवारा शेड उभारून समतानगर येथील कष्टकरी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या दोन्ही हायमास्टचे उदघाटन माजी आमदार मनोहर भोईंर यांच्याहस्ते करण्यात आले.तसेच बारवई आदीवासीवाडीकडे जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी निलेश सुरेश बाबरे यांच्याकडे मागणी केली होती.सदर समस्येचा निलेश बाबरे यांनी पाठपुरावा करून बारवईं गाव ते आदीवासीवाडी या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन माजी आमदार मनोहर भोईर आणि सरपंच अॅड नियती निलेश बाबरे, उपसरपंच ललिता वामन पडवल यांच्याहस्ते करण्यात पार पडले.

यावेळी कार्यक्रमस्थळी पोयंजे सरपंच जगदिश मते ,बारवईं ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा तारे, सदस्या उषा किसन वाघमारे, सदस्या सूनिता दळवी, सदस्य सुधीर पाटील, सदस्य अमिर सिताराम वाघमारे, शाखाप्रमुख नरेश पडवळ, जेष्ठ नेते निलेश बाबरे,अरुण पाटिल,रघुनाथ पाटील,अशोक ठाकुर,किशोर पाटील,विष्णू लहाणे,महेंद्र गायकर,नरेश पडवळ,राजेश पडवळ,अरूण पाटील,वामन पडवळ,भाऊ पाटील,नामदेव मुंढे,नारायण पडवळ,संदीप पडवळ,जयवंत शिंदे,दत्तात्रेय कातकरी,काळूराम कातकरी,लहू वाघमारे,पंढरी वाघमारे,काशिनाथ चव्हाण,जयदास पाटील,आत्माराम पाटील,बाळा पाटील,संजय खंडागळे ,प्रकाश बाबरे,विजय गायकवाड आदी उपस्थित होते.बारवई ग्रामपंचायत हद्दीत सरपंच अॅड.नियती बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती मिळाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच अॅड.नियती बाबरे, उपसरपंच ललिता वामन पडवल,निलेश सुरेश बाबरे व ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.