Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद हद्दीत विकास कामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

कर्जत प्रवेशद्वारास डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद हद्दीत विविध योजनांच्या फंडातून सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 79 लाख 36 हजार 605 रुपये खर्च करून प्रवेशद्वार बांधणे, विशेष रस्ता अनुदानातून 7 लाख 22 हजार 716 रुपये खर्च करून मुद्रे येथील गणपती घाट लगतचा रस्ता करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 12 लाख 69 हजार 547 खर्च करून मुद्रे खुर्द गावांमधील स्मशानभूमी तयार करणे व किता हाऊस बांधणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 93 लाख 71 हजार 117 रुपये खर्च करून मौजे दहिवली येथील जिजामाता उद्यान येथील भिंती चित्र (शिवसृष्टी गार्डन उभारणे), वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 27 लाख 3 हजार 488 रुपये खर्च करून साईनगर दहिवली येथील उद्यान विकसित करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 29 लाख 66 हजार 167 रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज नगर दहिवली येथील उद्यान विकसित करणे, विशेष रस्ता अनुदानातून 38 लाख 10 हजार 414 रुपये खर्च करून संजय नगर येथील शिवाजी दाभणे ते शिरसागर टेलर पर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 19 लाख 90 हजार 372 रुपये खर्च करून बाम चा मळा आकुर्ले गावातील अंतर्गत गटारे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 30 लाख 21 हजार 832 रुपये खर्च करून मुस्लिम दर्गा सभोवती सुशोभिकरण करणे या अशा एकूण सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वारास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याच्या प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, गटनेते नितीन सावंत,पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, महिला व बालकल्याण समिती सभापती संचिता पाटील महिला व बालकल्याण उपसभापती प्राची डेरवणकर, मागासवर्गीय कल्याण विशेष समिती वैशाली मोरे, नगरसेविका डॉ.ज्योती मेंगाळ, भारती पालकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, पुष्पा दगडे, नगरसेवक विवेक दांडेकर, संकेत भासे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीसदस्य आणि कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी या प्रवेशद्वाराला डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देत आहोत,आमच्या कारकिर्दीत हे सगळं होत आहे याचा आम्हाला आणि कर्जतकरांना जास्त अभिमान आहे असे सांगितले. आमदार महेंद्र थोरवे यांनी कठीण परिस्थिती असताना डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी खऱ्या अर्थाने समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून या संतांचे स्मरण व्हावे यासाठीच कर्जतच्या नगरी मध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार असावे असे सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत नगरपालिका हद्दीत महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने होत असलेल्या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीचे सरकार राज्यांमध्ये काम करत आहे, या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक संकटे आली त्याच्यावर मात करून या राज्याच्या विकासासाठी सातत्याने झगडणाऱ्या आणि देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची ख्याती आहे असे सांगितले. सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले तर नगरसेवक संकेत भासे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.