रोहा तालुक्यात मोठया प्रमाणात उद्योजक झाले तर येथे बेकारी राहणार नाही – केंद्रीय मंत्री नारायण राणे
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने मला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन जनतेचा आशीर्वाद घ्या व माझे काम जनतेपर्यंत पोहचवा असा आदेश ना. नरेंद्र मोदी साहेबांनी मला दिल्यानंतर मी आज आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. ना. नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा निर्धार केला असून भारताला महासत्ता बनविण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणून त्यांनी मला महत्वाचे असे उद्योग खात्याचे मंत्रिपद दिले आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हा ! आयात करण्यापेक्षा निर्यात वाढावा. निर्यात वाढली तर आर्थिक क्षमता देखील वाढते. उद्योजक तरुणांना माझे अधिकारी योग्य ते मार्गदर्शन करतील. त्यांना माझ्या उद्योग मंत्रिपदाचा निश्चितच लाभ होईल. रोहा तालुक्यात मोठया प्रमाणात उद्योजक झाले तर येथे बेकारी राहणार नाही आर्थिक सुबत्ता वाढेल असा सल्ला यावेळी केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी उपस्थित तरुण वर्गाला दिला.
केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणे हे कोकणात भारतीय जनता पक्षाचा जनाधार व पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्याच्या दृष्टीने सरसावले असून त्यांनी पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्या नंतर दक्षिण रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रेला शुभारंभ केला. त्यानंतर दुपारी १.३० वाजता जन आशीर्वाद यात्रेचे नागोठणेेे जवळील वाकणनाका येथे आगमन झाल्यानंतर नागोठणे विभाग भारतीय जनता पक्षाच्या वतीनेे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. नारायण राणे बोलत होते.

केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या समवेत महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविणभाऊ दरेकर, आमदार रविशेठ पाटील, माजी खाजदार निलेश राणे, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांतदादा ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, मारुती देवरे, रोहा ता. अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, ता. सरचिटणीस आनंद लाड, अलिबाग ता. अध्यक्ष परशुराम म्हात्रे, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, सिराज पानसरे, सुभाष पाटील, संतोष लाड, राजेंद्र लवटे, तुकाराम राणे, कृष्णा मिणमिने, रऊफ कडवेकर, सुरेश जैन, विवेक रावकर, अरुण वाघमारे, विठोबा माळी, मोरेश्वर म्हात्रे, प्रमोद गोळे, गौतम जैन, तिरत पोलसानी, नामदेव वाघमारे, शेखर गोळे, श्रेया कुंटे, अपर्णा सुटे, माधुरी रावकर, अर्चना वाघमारे, मुग्धा गडकरी, प्रियांका पिंपळे, संज्योनी लाड, सोनाली पडवळे, स्वानंदि चितळकर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान जन आशीर्वाद यात्रेचे स्वागता निमित्त संपूर्ण वाकण नाक्यावर कमान उभारून सर्वत्र भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे वाकणनाका भाजपामय झालेला दिसून येत होता. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा तालुका अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांनी विशेष मेहनत घेतली होती.
या वेळी भाजपा रोहा तालुका, भाजपा नागोठणे महिला विभाग, महिला बचत गट, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, श्री राम समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था रोहा, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे, वाकण व्यापारी संस्था आदींच्या वतीने ना. नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले.








Be First to Comment