खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांना रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे निवेदन
सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे/उदय मोरे |
दिवा रोहा मेमू पॅसेंजर गाडी चालू करण्याबाबत व पूर्वीच्या गाड्या थांबत होते त्या गाडयांना रोहा रेल्वे स्थानक थांबा मिळणे आधी मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे .
रायगडचे खासदार सुनिल तटकरे , रायगडचे पालकमंत्री अदितीताई तटकरे , विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांना लेखी निवेदन रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , उपाध्यक्ष पुरुषोत्तम देशमुख सचिव उदय शेलार , उदय मोरे , उल्लास मुद्राळे या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याने दिले . तसेच आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेंद्रशेठ दळवी , विधान परिषद आमदार रमेशदादा पाटील , रायगड जिल्हा अधिकारी , पब्लिक रिलेशन ऑफिसर, सेंट्रल रेल्वे मुंबई , विभागीय व्यवस्थापक सेंट्रल रेल्वे मुंबई , रा. जि . प. उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील , कदम साहेब पोलीस निरीक्षक रोहा रेल्वे स्टेशन , रोहा पोलीस निरीक्षक, प्रांत अधिकारी श्री. माने रोहा , कविता जाधव तहसीलदार रोहा, यांना ही याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहेत . तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघर्ष समिती वतीने देण्यात आली
यावेळी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या निवेदनाची व मागणीची दख्खल घेण्यात येईल यासाठी लोकसभेचे रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे साहेब रेल्वे मंत्री यांच्याकडे निश्चितच पाठपुरावा करतील असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री अदितीताई तटकरे या हि निश्चित पाठपुरावा करतील असे आश्वासन रेल्वे प्रवासी संघर्ष समितीला दिले.
२२/०३/२०२० रोजी कोरोना प्रादुर्भावामुळे दादर रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि दिवा रोहा पॅसेंजर बंद असून मुंबई इथे प्रवाश्याना ज्या अटी नियमानुसार लोकल ट्रेन सुरू केले असून, त्याप्रमाणे कोकणात असणारे रक्षाबंधन, गोपाळकाला , नारळीपौर्णिमा , गौरी गणपती महत्वाचे सण आता सुरू होत असल्यामुळे मुंबई वरून कोकणात येणारे पनवेल पासून पुढे स्टेशन पेण, नागोठणे, रोहा, रत्नागिरी, सावंतवाडी येथील प्रवाश्याना कोकणात जाण्या – येण्यासाठी ह्या गाड्या तात्काळ चालू करण्याचे गरजेचे आहे.
तसेच रोहा स्टेशन दरम्यान पनवेल येथील नेहमीच कामगार वर्ग, नोकरी, व्यापारी, उद्योग धंदे, एम.आय.डी.सी. येथील कामगार यांच्या नियमित अप डाऊन करत असतात. तरी काही लोकांच्या कोरोना प्रादुर्भावामुळे नोकऱ्या गेल्या असून काही लोकांना टिकविण्याकरिता रोहा दिवा आणि कल्याण रोहा ह्या पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात याव्या अशी विनंती हि करण्यात आली असून गाड्या १५ दिवसात सुरू करण्याकरिता आम्ही रेल्वे प्रशासनावर वरील विषयी आपणाकडून कार्यवाही होण्यास आपल्याकडून पाठिंबा पत्र मिळण्याकामी आम्ही रेल्वे प्रवासी संघर्ष समिती लोकप्रतिनिधी व रेल्वेप्रशासनाला संघर्ष समितीने विनम्रपणे विनंती केली आहे.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांना रोहा येथील कार्यक्रमात निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधूशेठ पाटील प्रदेश सरचिटणीस , विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर रोहा पंचायत समिती उपाध्यक्ष रामचंद्र सकपाळ युवक अध्यक्ष जयवंत मुढे यांच्याशी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , उपाध्यक्ष पुरुषोत्तम देशमुख सचिव उदय शेलार , उदय मोरे , उल्लास मुद्राळे उपस्थित होते .








Be First to Comment