Press "Enter" to skip to content

प्रक्रुती रिसाॅर्ट यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

प्रकृती रिसाॅर्ट लि.चे मॅनेजींग डायरेक्टर प्रभाकर शेट्टी यांच्या हस्ते गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रकृती रिसाॅर्ट लि.चे मॅनेजींग डायरेक्टर प्रभाकर शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्र ध्वजास अभिवादन करण्यात आले.प्रकृती रिसाॅर्ट लिमीटेडच्या वतीने कोरोना काळात सुद्धा आजुबाजुच्या वाड्या-वस्तीमध्ये नागरिकांन वर उपासमारीची वेळ न येण्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात आली.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिवशी प्रकृती रिसाॅर्ट लिमीटेड च्या माध्यमातूनच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.तर सर्व उपक्रम हे मॅनेजर उमेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला सर्व कामगार वर्ग हजर होते.तर स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रकृती रिसॉर्टस प्रा. लि.मध्ये काशिद येथील शाळेतील आजी माजी विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग व ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. व प्रकृति रिसॉर्टस प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर शेट्टी यांनी ग्रा.पंचायत काशीद हद्दीतील गरजू ग्रामस्थांना कॉविड-19 प्रतिकारात्मक लसीचे लसीकरणही प्रकृति रिसॉर्ट्स प्रा. लि. द्वारें करण्यात येईल अशी माहिती दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.