Press "Enter" to skip to content

सुरेखा पवार यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवासी सुरेखा धर्मा पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षाचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्या सर्वांशी मिळुनमिसळून राहत होत्या व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रायगड जिल्हा भोई समाजाचे कार्यकर्ते, तसेच बहुजन समाजाचे विविध स्थरावरील मान्यवर,आप्तस्वकीय व गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती धर्मा पवार,मुलगा सहेंद्र ,तीन मुली, सुना, पुतणे, नातवंडे व मोठा पवार कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी दोन्ही एकाच दिवशी शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या गोवे येथील राहत्या निवासस्थानी होणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.