Press "Enter" to skip to content

कोविडयोद्ध्याना रक्षाबंधन
फडके महाविद्यालयाचा उपक्रम

कोविडयोद्ध्याना रक्षाबंधन
फडके महाविद्यालयाचा उपक्रम

श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. २३
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
भारतीय संस्कृतीमधील मुलांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन होय. महाभारतातील कृष्ण द्रौपदीच्या कथेवरून ह्या सणाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि त्या वचनाचे प्रतिक म्हणून बहिण भावाला रक्षाधागा बांधते.
काळ बदलला तसा रक्षणकर्ता या शब्दाचा अर्थ ही बदलत गेला. गेली दोन वर्षे आपण ज्या कोविड-१९ या संकटाशी सामना करतो आहोत.. त्या परिस्थितीत भयानक विषाणूच्या संसर्गापासून आपले रक्षण केले ते आपल्या इमारतीमधील, गल्लीतील सफाई कामगारांनी!! विद्यार्थ्यांनी यावर्षी आपल्या रक्षणकर्ता असलेल्या आपल्या सोसायटी च्या वाॅचमन काका, सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, स्वच्छता दूत यांना कृतज्ञतेची राखी बांधून त्यांच्या अविरत कार्याचा सन्मान केला.
तोंडावर मास्क लावून आणि सुरक्षित अंतर राखून शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांच्या कार्याचा सन्मानही केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.