Press "Enter" to skip to content

कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीतर्फे रक्षाबंधन साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीच्या वतीने कर्जत पोलीस ठाणे व नगरपरिषदेच्या अग्निशमन दल केंद्रात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

सदरक्षणाय खलनिग्रणाय या घोषवाक्य प्रमाणे 24 तास कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस बांधवांना एकही सण साजरा करता येत नाही. समाजासाठी अत्यंत आवश्यक पण काही अंशी सणासुदीच्या दिवशी समाजापासून उपेक्षित राहिलेला हा घटक, गणपती, दिवाळी, दसरा या सणाच्या दिवशीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात, नोकरीसाठी मूळ गावापासून दूर, सततच्या बदल्या, वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास यामुळे बहिणीसोबत रक्षाबंधनाचा सणही त्यांना साजरा करता येत नाही. पोलीस बांधवांच्या या हक्काची, कर्तव्याची जाणीव आम्हा महिला वर्गाला आहे. म्हणूनच कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून आज कर्जत शहरातील पोलीस पोलीस दलातील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाला तसेच अग्निशमन दलातील जवानांना राखी बांधण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा ॲड. रंजना धुळे यांनी दिली.

याप्रसंगी पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरुण भोर, त्यांचे सहकारी तसेच अग्निशमन दलातील प्रदीप हिरे,आदी सहकारी तर कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजना धुळे, शहराध्यक्षा पुष्पा दगडे, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा उज्वला हजारे,नगरसेविका सुवर्णा निलधे, भारती पालकर, बीडच्या सरपंच प्रभावती लोभी, कोंदीवडेच्या सरपंच भारती शिंदे, उकरूळच्या सरपंच वंदना थोरवे, नांदगावच्या सरपंच दिपीका जंगले, बोरिवलीच्या सरपंच वृषाली क्षीरसागर, दामतच्या उपसरपंच नयना आखाडे, वदपच्या उपसरपंच मनीषा पाटील, मीनल धुळे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.