सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उदानी फाउंडेशन वाशी, नवी मुंबई यांच्या वतीने आणि मोठीजुई सामाजिक विकास युवा मंच यांच्या विशेष प्रयत्नाने मोठीजुई माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गेले चार वर्षे वाशी नवी मुंबई मधील नामांकित सामाजिक संस्था “उदानी फाउंडेशन ” यांच्या वतीने उरण तालुक्यातील मोठीजुई माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांना प्रोत्साहित केले जाते.कोरोना चा प्रादुर्भाव आसल्याने शाळेतील शिक्षक वृंदानी विध्यार्थ्यांसाठी सामाजिक अंतर आणि सॅनिटायजरची व्यवस्था केली होती .

यावेळी उदानी फाउंडेशन च्या वतीने विना गांधी, प्रिया पाटील , रोहित लोहोट, अतुल जेढे तर मोठीजुई सामाजिक विकास युवा मंचचे राजेश भोईर, विवेक पाटील, पवन जोशी, शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर, नामदेव ठाकरे,रंजना मोकळ, रवी कदम , नितेश पाटील, शशिकांत पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच शाळेच्या शिक्षिका रजनी तांडेल यांनी शब्द सुमनांनी सर्वांचे स्वागत केले तदनंतर सर्व पाहुण्यांचे गुलाब पुष्प देउन त्यांचे सन्मान करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक के.एच.भोईर यांनी आपल्या शाळेची परिस्थिती,उंचावळेला दर्जा,शाळेतील विद्यार्थ्यांची घौडदौड, गेल्या 19 वर्षापासून शाळा विना अनुदानीत तत्वावर चालत असलेली सर्व हकीकत सांगितली.पुढील वर्षी सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वस्तू वाटप करण्याचं आश्वासन उदानी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले.आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य किशोर भोईर यांनी मानले.








Be First to Comment