समुद्रकिनारी निघाली मिरवणूक : नोकरीतून नारळ समुद्राला केला अर्पण
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
गेल्या २० वर्षा पासुन नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूल मधे साजरा केला जात आहे .विद्यार्थि पारंपारिक कोळी वेशभुषेमध्ये उत्सवात सामील होत आपली कोळी संस्क्रुतीचे दर्शन घडवितात.

नंतर नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघते.समुद्र किनाऱ्यावर मिरवणुक पोहचल्या नंतर विद्यार्थि,माजी विद्यार्थि पारंपारिक नृत्य सादरीकरण होते.नंतर मोठ्या भक्तिभावाने प्रतिकृतीचे पुजन होऊन .नारळ नौकेतुन समुद्राला अर्पण केला जातो.

यावेळी राजकिय तसेच कोळी ,आगरी समाजातील नेतेगण.,शिक्षण प्रेमी मोठ्या संखेने हजर असतात. परंतु कोरोना महामारीमुळे यावर्षी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, विद्यालयाचे व्हा.चेअरमन के. एल. कोळी, माजी चेअरमन शिवदास नाखवा, माजी उपसरपंच प्रदीप नाखवा, मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक ए. टी. पाटील सर, इंग्रजी माध्यमाच्या प्रिन्सिपल सौ.प्रभु मॅडम, सोसायटीचे सदस्य, स्कुल कमिटीचे सदस्य,सदस्या,ग्रामस्थ व शिक्षकवर्ग उपस्थित होते.








Be First to Comment