Press "Enter" to skip to content

रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शौर्याचा सन्मान

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बंधू रूपात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या हातावर राखी बांधून रोहे तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अग्निशमन
जवानांच्या हातावर राखी बांधून व बंधूभावाची भावना व्यक्त करून एक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे.

राखी बांधून कृतज्ञता व्यक्त कराताना रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ.प्रितम पाटील व सुवर्णा रहाटे सरपंच धाटाव,गीता मोरे, सुविधा भोकटे,नेहा भोकटे,शुभांगी माने,उत्तरा म्हसकर, प्रिया मोरे, कल्पना मोरे, ज्योती डाके,स्नेहा ताडकर,रोशनी बेर्डे, अपर्णा कोंडे,व सर्व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.तसेच अग्नीशमन दलाचे प्रमुख घरत साहेब तसेच अन्य जवानही उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत क्षणाचीही उसंत न घेता व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाचे जवान करीत असलेले कार्य हे उल्लेखनीय व गौरवास्पद आसून त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहज.तर त्यांच्या बंधूभावाचे नाते अधिक ध्रुढ व्होऊन बहिण-भावाचे तसेच सामाजिक बांधिलकीचे एक वेगळे नाते जपावे या उद्देशाने त्यांना राखी बांधून क्रुतज्ञतेचे भाव व्यक्त करण्याचा व बंधूभावाचे हे नाते अधिक ध्रुढ करण्यासाठी आम्ही रक्षाबंधन केले असल्याच प्रतिक्रिया तालुकाध्यक्षा प्रितम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.