सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची महत्वपूर्ण माहिती रासपचे नेते भगवानराव ढेबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
नुकताच कामराज नगर, घाटकोपर मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसह कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये (२०२२) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत.
यावेळी उमेदवारांची चाचपणी करत रायगड जिल्ह्यातील निजामपूर जि.प.गट – संतोष ढवळे (धनवीकर), लोणशी गट – सुर्यकांतजी टेंबे, माणगाव पं.स.निजामपूर गट – रविंद्र सुतार आदि उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.








Be First to Comment