Press "Enter" to skip to content

बोर्ली येथील महावितरण विभागाचा अजब कारभार.! मंजुरी आधीच एल.टी.जोडणी

कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मंगेश थळे यांची मागणी

सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांनी मंजुरी आधीच एल.टी. जोडणीचे(लाईन)पूर्ण केले आहे.तरी याबाबत कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बोर्ली मांडला येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश थळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे रायगड जिल्ह्याचे अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मंगेश थळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे रायगड जिल्ह्याचे अभियंता यांच्याकडे केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,बोर्ली येथील आपल्या विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांची एल.टी.जोडणी मंजूर आहे की नाही याबाबत मुरूड येथील उपकार्यकारी अभियंता येरेकर तसेच रोहा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे 8 मार्च 2021 रोजी प्रत्यक्ष काम झाल्याचे छायाचित्रासहित तक्रार केली होती. तसेच मुरूड जंजिरा येथील उप अभियंता येरेकर यांना पुन्हा 5 एर्पिल 2021 रोजी स्मरणपत्र देत केलेल्या तक्रारीची माहिती मागितली.

मात्र त्यांनीसुद्धा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता,बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे सुरई येथील साईनाथ एकनाथ पाटील यांची बदली लाईनमंजूर करण्यापूर्वीच काम केले असून मूळ प्रस्ताव जुने विद्युत पोळ बदलले असल्याचा आहे.त्याचप्रमाणे भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोईघर येथील पुष्पा नरेश बिरवाडकर यांचे सुद्धा लाईनचे काम मंजूर नसतानासुद्धा आधीच काम करून घेतले आहे.सदर कामे ही बरोबर आहेत का ? असा सवाल करीत सदर कामासाठी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करीत आधीच काम मंजूर करण्यात आले आहे असे भासविण्यात आले आहे.

शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन रचून फसवणूक करणे भारतीय दंड संहिता 1860 फौजदारी प्रक्रिया संहिता1973 चे कलम 197 व 198 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच या बाबत कार्यलयाकडून सखोल चौकशी होऊन कनिष्ठ अभियंता चव्हाण यांच्यावर फौनगुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे.त्यांच्यावरील निलंबनाची नोंद ही सेवापुस्तकात घ्यावी व त्या सेवापुस्तकाची प्रमाणित नक्कल मिळावी.कनिष्ठ अभियंता चव्हाण हे त्यांनी केलेले गैरव्यवहार टाळण्यासाठी बदलीच्या प्रयत्न करीत आहेत. जोपर्यंत चव्हाण यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची बोर्ली येथून कुठेही बदली करण्यात येऊ नये,तसेच चव्हाण यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनीसुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी मंगेश थळे यांनी केली आहे.

सदर निवेदनाच्या प्रति ह्या अधिक माहिती साठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता,तसेच वाणिज्य विभागाचे मुख्य अभियंता यांना सुध्दा पाठविले असल्याचे थळे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.