सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मधील इनरव्हील क्लबच्यावतीने कर्जत पोलिस ठाण्यात फ्रेडशिप डे साजरा करण्यात आला. यावेळी क्लबच्या सदस्यांनी पोलिसांना फ्रेडशिप बेल्ट बांधून मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
इनरव्हील क्लब अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतो, भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात मैत्री दिन साजरा केला जातो. कर्जत मधील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा करुणा पराडकर, मोनिका बडेकर, पल्लवी सावंत, ज्योत्स्ना शिंदे, सुप्रिया गिरी, सुलोचना गायकवाड, वैशाली दांडेकर, सरस्वती चौधरी यांनी कर्जत पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक अरुण भोर, पदाधिकारी, पोलीस कर्मचारी यांना फ्रेडशिप बेल्ट बांधून मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment