Press "Enter" to skip to content

चौक बाजार पेठेत बांबुच्या काठीपासून विको फेंडली मखर विक्रीस सज्ज

निसर्गात सहज उपलब्ध होणारे बांबु च्या मखरांची अनेकांना भुरळ

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

राज्य सरकारने तीन वर्षी पुर्वी थरमॉकॉल बंद करण्याचा निर्णय घेतल्या व्यवसायीकाने आपला उद्योग कापडी मखर, बांबुच्या काठीपासून बनविण्याकडे वळविला आहे. गणरायाच्या अगमनासाठी तीन आठवड्यांचा कालावधी असतांना मखर बाजारपेठत उपलब्ध झाल्या आहेत.सहा महिने अधिच मखर बनविण्याचा उद्योग सुरु असून निसर्गात सहज उपलब्ध होणारे बांबु या पासून मोठ्याप्रमाणावर विविध प्रकारे नक्षीकाम करुन मखर तयार करुन विक्रीस ठेवण्यात आली असून.२००० पासून ते १०,००० रुपये पर्यंत मखर विक्रीस ठेवण्यात आली असल्याचे चौक येथिल कारागीर रोहीदास शेळके यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

या वर्षी बाजार पेठेत मोठ्याप्रमाणात नक्षीकाम केलेल्या बांबु पासून डायमंड विको फ्रेंडली च्या रेडीमेड मखर उपलब्ध झाल्या असून,गणेश भक्तांच्या मागणी नुसार मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्यांचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.उत्तम कलाकुसर व उत्तमरीत्या सजवलेली ही मखर भक्तांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरत असून,मागणी नुसार ऑडर स्विकारली जात असल्यांचे येथिल व्यवसायिक शेळके यांनी सांगितले.

विविध प्रकारचे आकर्षक देखावे व गणरायाला साजेशी सजावट करण्यावर भाविकांचा भर असल्याने विविध प्रकारच्या मखरांना मोठी मागणी आहे.गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना तयारीला उधाण आलेले असून वेळीची बचत व्हावी या उद्देशाने तरुणाई आज प्रत्यक्ष कलाकुसर करण्यापेक्षा रेडिमेड मखरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

गणरायाच्या अगमनांचे सर्वांनाच वेध लागले असून, सार्वजनिक मंडळ आणी घरघुती सजावट तयारीला सर्वांचीच लगबग सुरु झाली असून, त्याला पर्याय म्हणून आज रेडिमेड मखरांच्या सजावटीला मागणी वाढत आहे.ही रेडीमेंट मखर उत्तम कलाकुसर आणी उत्कृष्ट असून गणरायाची पूर्ण आरास व आजूबाजूला आवश्यक असलेली आकर्षक रंगरंगोटीची अश्या मखारांना मोठी मागणी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.