Press "Enter" to skip to content

रोहा येथील प्रसिद्ध डॉ. फरीद चिमावकर यांचा कोव्हिडयोध्दा म्हणून सन्मान

सिटी बेल | रोहा | याकूब सय्यद नागोठणे |

कोरोनामुळे गेली दीड वर्ष सर्वत्र भयावह परिस्थिती आहे. कोरोनामुळे एकीकडे आपली रक्ताची नाती भीतीपोटी आपली साथ सोडत असल्याचे विदारक चित्र समाजात असताना रोह्यातील डॉक्टर फरीद यांच्यासारखे समाजसेवक मात्र या काळात देवदूताप्रमाणे लोकांच्या मदतीला धावून येत आहेत.

रोज दिडशे ते एकशेपंचाहत्तर पेशंटची ओ. पी. डी. तरीही चेहरा कायम हसतमुख, रुग्णांच्या शरीराबरोबरच मनाचीही शुश्रूषा करण्याचे घेतलेले व्रत, अत्यल्प दरात मिळणारी विश्वसनीय वैद्यकीय सेवा ,प्रभावी समुपदेशन यामुळे डॉ. फरीद चिमावकर यांचे वेगळेपण नेहमीच उठून दिसते.

सध्या करोना काळातील निस्वार्थ सेवेसाठी रायगड जिल्हा रोहा तालुका खारी या गावाची ग्रामपंचायतीतर्फे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत डाँक्टर फरिद चिमावकर यांचा सन्मान करण्यात आला.

खरोखरच एका खऱ्या समाजसेवकाला गौरवून खारी ग्रामपंचायतीने एक चांगली सुरुवात केली आहे.
खरतर डॉ. फरीद चिमावकर यांच्या सारखी मंडळी ही अशा सत्कारांपासून नेहमीच लांब राहून काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यासारख्या निस्वार्थ सेवा करणाऱ्या मंडळींचा सन्मान झाला याचा मनस्वी आनंद आहे. असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सन्मान कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले

तसेच डॉ. फरीद चीमावकर यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.