Press "Enter" to skip to content

जानकी नागावकर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे‌ |

रोहे तालुक्यातील श्री. क्षेत्र तळवली येथील रहिवासी असणाऱ्या जानकी भिकू नागावकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी व्रुद्धपकालाने राहत्या घरी दु:खद निधन झाले.

जानकी नागावकर या सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या तसेच प्रत्येक सुखदुःख प्रसंगी सहभागी होऊन काम करणा-या होत्या. तर कुटूंबासमवेत शेती व मडके तसेच चुली बनविणे आदी पुर्वाइ व्यवसाय त्यांनी सांभाळून जतन करून ठेवला.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजतात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.

त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार दि.२४ आँगस्ट रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्रवार दि.२७ आँगस्ट रोजी हे दोन्ही विधी त्यांच्या तळवली येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.