सिटी बेल | रोहे-रायगड | नंदकुमार मरवडे |
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी विभाग, मंडणगड तालुका शाखेने स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२१ रोजी “स्वातंत्र्य गीत महोत्सव” विशेष देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती.
सदरच्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे वरिष्ठ मंडळ शशरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीमती शुभांगीताई काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्ष, फुलचंद नागटिळक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,डॉ अ.ना.रसनकुटे कोकण प्रदेशाध्यक्ष, डॉ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा यांची संमत्ती लाभली आहे.
सदर स्वातंत्र्य गीत महोत्सवासाठी मंडणगड तालुका शाखेच्या उपाध्यक्षा सौ संगीताताई पंदिरकर आणि कार्याध्यक्ष श्री अमोल दळवी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांना खजिनदार श्री शैलेश शिगवण यांनी सहकार्य केले आहे. मंडणगड तालुका शाखा कार्यकारणी ने सदर उपक्रम विशेष उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
सदर उपक्रमासाठी परीक्षक म्हणून डॉ. श्रीधर बाम संगीत विशारद, पुरुषोत्तम कर्वे संगीत विशारद,शांताराम पवार यांनी निरपेक्षपणे परीक्षण केले आहे. सदर विशेष उपक्रमासाठी विकास शेटे,दिनेश लेंडे ,वैभव कोकाटे, राहुल कोकाटे,हेमंत भागवत, अमित तांबे विनोद जाधव,सचिन शेठ यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे तसेच तांत्रिक सहकार्य गोविंद मुंडे यांनी केले आहे. दिलीप मराठे यांनी प्रत्यक्ष कारवाईसाठी तसेच शांताराम पवार यांनी समारंभासाठी हॉल उपलब्ध करून दिला आहे. सदर विशेष गीत गायन उपक्रमासाठी मंडणगड तालुक्यातील सर्व मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.पूजा पुरुषोत्तम कर्वे, द्वितीय क्रमांक सौ.दिपांजली कैलास धाडवे, तृतीय क्रमांक कु.युवराज सुशील देवघरकर, उत्तेजनार्थ क्रमांश्री श्री. दिपक अरुण बागुल तसेच कु.श्रद्धा राजेश जाधव यांना मिळाला आहे. सहभागी ३८ स्पर्धकांतून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुका अध्यक्ष संदीप शंकर तोडकर यांनी सदर उपक्रमाचे श्रेय संगीता ताई पंदिरकर व अमोल दळवी यांना दिले आहे. १९ तारखेला स्वर्गीय राजकुमारजी काळभोर सर संस्थापकीय राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्य गीत महोत्सव बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभाचे अध्यक्ष पद सौ स्वातीताई विजय भागवत यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून विनोद जाधव शेट्ये मँडम , जयवंत दळवी उपस्थित होते. सहभागी स्पर्धक आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विजेत्यांना आर्थिक बक्षीस आणि सन्मानपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. मंडणगड तालुका अध्यक्ष यांनी यावेळी सर्व देणगीदार, परीक्षक, पत्रकार तसेच सर्व मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त केले. वंदे मातरम हे देशभक्ती पर गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.








Be First to Comment