Press "Enter" to skip to content

मोहोपाडा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा श्री दत्त मंदिराच्या सभामंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्याकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लिमये ब्लड बॅक यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बाळकृष्ण राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले.यावेळी जेष्ठ नागरिक तात्यासाहेब म्हस्कर यांच्याहस्ते श्रीगणेश व शिवप्रतीमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराला सूरुवात करण्यात आली.

यावेळी सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिताराम म्हस्कर, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होवून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.यावेळी रक्तदात्यांची रक्तदाब, रक्तातील शर्करा तपासणी करून नंतर रक्तदान करण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी रक्तदान केले.रक्तदान केलेल्या नागरिकांना प्रशस्तीपत्र व अल्पोपहार देण्यात आले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे, जेष्ठ नेते सुभाष आहिर,माजी उपसरपंच रामचंद्र मुंढे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, मंगेश पाटील, मारुती खाने, पांडुरंग भौड , रविंद्र देसाई,आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.