सिटी बेल | अलिबाग |
कोविड मध्ये रायगड मधील रुग्णांना रक्ताची गरज भागविण्यासाठी जिल्हा रक्तपेढी अलिबागच्या सहकार्याने श्री मंगल कार्यालयात रक्त दान शिबीराचे उद्घाटन अलिबाग नगरपालिका चे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष एड.मानसी म्हात्रे,बुरुड समाजाचे जिल्हा अध्यक्ष रुपेश जामकर,रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, नगर सेविका सुरक्षा शाह,संजना किर, अलिबाग तालुका अध्यक्ष संजय मोरे,उपाध्यक्ष अजय करबत,सचिव विशाल खैरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाज अध्यक्ष यांनी नगराध्यक्ष प्रशान्त नाईक यांना समाजाला समाज भवन बांधण्यास जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन यावेळी दिले. कार्यक्रम प्रसंगी रायगड भूषण,जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील याचा जिल्हा अध्यक्ष रुपेश जामकर यांनी पुष्पगुच्छ देऊन समाजातर्फे सन्मान केला.यावेळी रक्तदान करणाऱ्या ना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. दिपक गोसावी , रक्तसंक्रमण अधिकारी, सौ.मनिषा नवाळे ,रक्तकेंद्र, तंत्रज्ञ),फरीद अफवारे (जनसंपर्क अधिकारी),संतोष ढाकणे, (अधिपरिसेवक)ब्रदर, उमेश पाटील, महेश घाडगे आदिंनी रक्तसंकलनाचे काम केले.








Be First to Comment