अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ऑक्सिजन मिटर तसेच शालेय मुला-मुलींना सायकली दिल्या भेट
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोका मल्याद्री आणि त्यांचे बंधू मोहनराव मल्याद्री यांनी कोरोना काळात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जावून ऑक्सिजन मिटर तसेच अन्य वस्तू देऊन मोलाचे सहकार्य केले तसेच या विभागातील शालेय मुला-मुलींना सायकली देऊन त्यांना शाळेत जाण्यास प्रोत्साहित केले. गेली सात वर्षे हे बंधु कुडली तसेच अन्य परिसरात मोलाचे सहकार्य करत असल्याचे सायकल वाटप कार्यक्रमात कुडली येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तम कामथेकर यांनी सांगितले.
७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन ब्रदर्स फार्म हाऊस कुडली चे मालक रोका मल्याद्री आणि मोहनराव मल्याद्री आणि दिपक यादव, संदिप राऊळ व हेमंत यांच्या सहकार्यातून कुडली विभागातील 18 शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सायकली वाटप केल्या.
ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी मुले मुली शिक्षणाच्या प्रवाहात कमी आहेत अशी मुले नियमितपणे शाळेत जावीत, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, शाळेत जाण्यासाठी पायपिट होऊ नये, वेळेत शाळेत पोहोचावे या उद्देशाने इतर मुलांबरोबर आदिवासी मुला-मुलींना सायकली देण्याचा संकल्प केल्याचे रोका मल्याद्री आणि मोहनराव मल्याद्री यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
ग्रामीण तसेच डोंगराळ भागातून प्राथमिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले यामध्ये ईशा भोऱ्या मांडवकर, निकिता शंकर जाधव, सरिता अनंत जाधव, समिता रमेश जाधव, परशूराम सुरेश कोळी, परशुराम अनंत जाधव, अदित्य गणेश कदम, श्रृती शैलेश पंदेकर, पूर्वी सतिश कामथेकर, सिद्धार्थ विनोद पडवळ, देवेंद्र प्रदिप कदम, तन्मय दिपक कामथेकर, स्वयंम दिलीप पंदेकर, श्रवण दत्ताराम धोंडगे, राम गणेश दळवी, श्रावणी शैलेश पंदेकर, सोहम दिपक कामथेकर आणि सुजल विनोद पडवळ आदिंना सायकल वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रोका मल्याद्री, मोहनराव मल्याद्री, दिपक यादव, संदिप राऊळ, कुडली ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तम कामथेकर, सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न कामथेकर, सतिश कामथेकर, लक्ष्मण कामथेकर, विजय कामथेकर, केंद्र प्रमुख रेश्मा पोळेकर, कुडली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे पदवीधर शिक्षक उमेश महाडेश्वर, उपशिक्षक राजेश म्हात्रे, अनिल नागरोळे, नरेश महाडिक, आदर्श माध्यमिक विद्यालय कुडलीच्या मुख्याध्यापिका जोत्सना मुंढे, मालिनी बक्कम, ग्रामस्थ तसेच विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम शासनाचे सोशल डिस्टन्सचे नियम पाळून पार पाडला.








Be First to Comment