Press "Enter" to skip to content

खालापूर युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड.योगेश मानकवळे यांची बिनविरोध निवड

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

खालापूर युवा वकिल संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कलोते येथिल शुभम फार्म येथे पार पडली असली असून या सभेत युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध अँड.योगेश अरुण मानकवळे यांची निवड करण्यात आल्याने मानकवळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अँड.योगेश मानकवळे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात येत आहे.

युवा वकील संघटनेचे सन 2020 ते 2021 या काळावधीतील अध्यक्षपद अँड.संदेश साहेबराव धावारे यांनी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर अँड.धावारे याचा अध्यक्षपदाचा कालावधी संपल्याने त्याच्या एक वर्षीय उल्लेखनीय कामगिरिबद्दल संघटनेच्या वतीने अँड.आनंद गायकवाड, अँड.उमेश पवार, अँड.अभिजीत बळकवडे यांच्या हस्ते शाळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व युवा वकिल संघटनेच्या नवनिर्वाचीत अध्यक्ष म्हणून अँड.योगेश अरुण मानकवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.मानकवळे यांचा संघटनेच्या वतीने शाळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करीत वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला.

तर सभेचे प्रस्तावीक अँड विकास म्हात्रे यांनी केले असून अँड.आनंद गायकवाड, अँड.उमेश पवार, अँड. संजय टेंबे, अँड.अभिजीत बळकवडे, अॅड.मिलींद सुखवकर, अँड.जे.डी.पाटील, अॅड.मुनिदास गायकवाड, अँड.जितेंद्र जाधव यांनी विचार मांडले तसेच सभेचे सुत्रसंचालन अँड.सचिन चाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड.जयेश तावडे यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अँड. शाहनवाज खान, अँड.जाकीर अढळ अँड.मयुर कांबळे, अँड.रमेश पाटील, अँड.रितेश पाटील यांनी भरपुर मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.