शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कायम बरोबर — सरपंच राजेश मोकल
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील काराव, डोलवी, वडखळ, बेणेघाट, कोळवे, वावे खारकारावी, खारमाचेला,खारघाट, खारचिर्बि, खारजांभेळा, खारढोंबी या गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात येत असून शासनानेे शेतकऱ्यांंंच्या जमिनी संपादित करताना विश्वासात घेत नसल्यानेे या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.त्यामुळे प्रकल्प माहिती द्यावी अन्यथा आमचा या प्रकल्पाला विरोध असेल असा एकमुखी ठराव घेऊन शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना भेटून तसे निवेदन देखील दिलेे आहेे.
यावेळी वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल, गडब तुळशीदास कोठेकर, डोलवी अनिल म्हात्रे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मात्र यात पक्ष न बघता आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत.त्यामुळे आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असला तरी आम्ही सरकारच्या मित्र पक्षाकरीता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आहोत त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना निवेदन द्यायला गेल्याने आम्ही अविश्वास दाखविल्याचा काही विरोधकांनी अपप्रचार केला आहे. पण यात काहीही तथ्य नाही आमचे नेते खासदार सुनील तटकरे आहेत. आमच्या भागात आलेला हा एमआयडीसी प्रकल्प घालविण्यासाठी जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे राजेश मोकल, अनिल म्हात्रे आणि तुळशीदास कोठेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तर प्रकल्पाच्या विरोधात राजकारणा पलिकडे आम्ही समाजकारणाला प्राधान्य देऊन आमच्या भागात होणाऱ्या एमआयडीसी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याने नुकतेच शेतकऱ्यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना निवेदन दिले आहे.राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा हा मुद्दा बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी आमदार महेंद्र दळवी यांना निवेदन दिले असून यापूर्वी शेतकऱ्यांनी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील यांना देखील निवेदन दिले आहेत असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे यांनी सांगितले.







Be First to Comment