सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
झाडांना राखी बांधून उरण तालुक्यातील सारडे गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन दिन साजरा केला.
अनुभवातून शिकूया विज्ञानाचे धडे या उपक्रमा अंतर्गत भारतीय सण -संस्कृतीची विज्ञानाशी असणारी सांगड अधोरेखित करण्याकरिता सारडे उरण येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नाविन्यपूर्ण शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगणात पोहचविणारे मुख्यध्यपिका सौ उर्मिला जी. गावंड मॅडम, उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर, सौ.समृद्धी वऱ्हाडी मॅडम ,श्री सुनिल जी नऱ्हे सर या सर्व शिक्षक वर्गाच्या संकल्पनेतून आणि विद्यार्थीवर्गाच्या सहभागातून आज एका अनोख्या संकल्पनेला सत्यात उतरवत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे उरण येथील शाळेतील शिक्षकवर्गाच्या पर्यावरण पूरक व नाविन्यपूर्ण संकल्पनेला मुहूर्तरूप देतं विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडांना राखी बांधत पर्यावरणाप्रति जागरूकता आणि निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

नमो वृक्षेभ्यः! यथेयं पृथिवी देव भूतान गर्भे दधाति वै! तथेयं वृक्षक दध्यात त्वा तस्यावसे हृदये !! अर्थात वृक्षांस नमस्कार असो, पृथ्वीवरील सर्व सजीवांप्रमाणेच वृक्ष सुद्धा पृथ्वीचीच संतती आहे. हे परमेश्वरा ,ह्या रोपट्याचे रक्षण करण्यासाठी तू साहाय्य कर ! याच उदात्त भावनेतून शालेय शिक्षणा सोबतच निसर्गाप्रति आस्था व व्यावहारिक आणि सामाजिक ज्ञानाची शिदोरी ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता कामी यावी म्हणून सदैव नवंनवीनं अभिनव संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून जिचं नावं रायगड मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आहे अशी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे उरण ही होय.

या शाळेतील शिक्षकवर्गाने आणि विद्यार्थ्यांनीं साकारलेल्या एका आगळ्या वेगळ्या पर्यावरण पूरक संकल्पनेचं आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्व स्थरांतून आणि खास करून निसर्गप्रेमीं कडून खूप कौतुक केलं जात आहे.








Be First to Comment