Press "Enter" to skip to content

भोईघर येथे विजेची जिवंत वाहिनी गुरांवर पडल्याने आठ पाळीव जनावरांचा मृत्यू

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुरुड तालुक्यातील भोईघर गावानजीक एका इलेक्ट्रिक पोल च्या जवळ शेतामध्ये गुरे चरत असताना अचानक पणे पोल वरील जिवंत विद्युत वाहिनी पाळीव जनावरांच्या अंगावर पडल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.

वीज महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र स्थानीक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा अशीच घटना बोर्ली भागात घडली असताना तिथे सुद्धा जनावरांचा मृत्यू झाल्या नंतर अवघ्या काही महिन्यातच पुन्हा अशीच घटना घडल्याने वीज महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे.या भागातील स्थानीक शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला असून सदरची घटना वीज महावितरण कंपनीच्या वीज कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असून दुभती जनावरे मृत्यू मुखी पडली आहेत.तातडीने येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

जिवंत विद्युत वाहिनी पाळीव प्राण्यांच्या अंगावर पडल्यामुळे तीन गाई,चार बैले,व एक वासरू यांचा मुर्त्यू झाला आहे.ज्या शेतकऱ्यांचे पाळीव प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत.त्यांच्या घरात दुखी वातवरण आहे.सदरील घटनेची रेवदंडा पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करण्यात आली आहे.पाळीव जनावरांचा मृत्यू होताच पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाडावे यांनी या पाळीव प्राण्यांचे शव विच्छेदन करून सदरील प्राण्यांना विजेचा मोठा शॉक लागल्याने सदरील प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

केशव कासार यांची तीन जनावरे,सचिन महागावकर यांची दोन जनावरे,तर महेंद्र कदम,प्रफुल्ल वाघे,व पीटर पेय यांची प्रत्येकी एक एक जनावरांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुड तालुक्याचे प्रभारी उप कार्यकारी अभियंता महेंद्र राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांचे पाळीव जनावरे मृत्यू मुखी पडले आहेत त्यांना महावितरण कडून निश्चितच नुकसान भरपाई मिळणार आहे.यासाठी मृत्यू पडलेल्या जनावरांचा शव विच्छेदन अहवाल व महवित्रांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाकडे तातडीने पाठवण्यात येणार असून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.