Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सदस्य नोंदणीला सुरुवात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांवर काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 1989 साली स्थापन केलेले हे संघटन राज्याच्या सीमा ओलांडून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, स्त्री- पुरुष समता, पर्यावरण पूरक उपक्रम, जाती निर्मूलन, मानसिक आरोग्य, संविधान प्रसार अशा विविध विषयांवर समितीचे कृतिशील काम चालू असते.

प्रबोधन व्याख्याने, चमत्कार सादरीकरण, कार्यशाळा सांस्कृतिक माध्यमातून काम चालते. समितीच्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व तालुक्यांत शाखा आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत प्रबोधनाचा विचार पोहचावा व लोकांना जोडून घेता यावं म्हणून समिती महत्वाच्या गावांमध्ये संघटित काम सुरू करत आहे. रसायनी- मोहोपाडा परिसरातही समितीचे काम सुरु झाले आहे. जे या परिवर्तनाच्या विचारांशी जोडून घेऊ इच्छित आहेत तसेच सक्रिय किंवा हितचिंतक सदस्य होऊ इच्छित आहेत त्यांनी संपर्क करावा, असे समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक संपर्क : आरती नाईक 8652223803, रोहिदास कवळे 9370035676, महेंद्र नाईक 9594094785 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.