सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात बुधवार दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी रात्री अचानक अपंग प्रमाणपत्र विभागात आग लागली होती. या घटनास्थळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा प्रमुख ऍड.महेश मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली.
घटनास्थळी भेट देत असताना महेश मोहिते यांनी जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.त्यांनी सांगितले की,नागरिकांचे दैव बलवत्तर म्हणून आग ही दिवसा लागली नाही. दिवसा लागली असती तर मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा पुन्हा समोर आला अपंग प्रमाणपत्र विभाग, वॉर्ड क्रमांक १३., बाह्यरुग्ण विभागात काल आग लागली.

मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितास इजा पोहचली नाही आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सर्वत्र काळ्याकुट्ट परीसराने आगीची भीषणता लक्षात आली आहे.सदरची आग लागली की लावली गेली याचाही तपास रुग्णालय प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
बुधवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागात ही आग लागली. या अपंग विभागाच्या वरील मजल्यावर असलेल्या वसतिगृहात मुली होत्या. आग लागल्याचे लक्षात येताच मुली घाबरुन त्या बाहेर पळाल्या. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.मात्र रुग्णालयातील कर्मचारी मयूर पाटील (रा. कुरुळ, अलिबाग) व एका सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली.त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ठाण्यातील एका कंपनीने ही ऑडिट केले असून, यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर सहा महिने उलटत नाही, तोच आगीची दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या रुग्णालयाच्या फायर ऑडिटवरही संशय व्यक्त होत असून या कंपणीचीही चौकशी होणे गरजेचे आहे.असेही मोहिते यांनी सांगितले.
यावेळी महेश मोहिते यांच्यासमवेत उपाध्यक्ष हेमंत दांडेकर ,युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण शहासने व इतर पदाधिकरी उपस्थित होते.








Be First to Comment