शेतकऱ्यांना गंडवू पाहणाऱ्या सिडको अधिकारी वर्गाची उडाली भंबेरी !!
सिटी बेल | उरण | अजित पाटील |
सिडकोने प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कच्या निमित्ताने उरणच्या धुतूम गावात लावलेली जनसुनावणीची बैठक येथील ग्रामस्थ स्व भूमिपुत्र शेतकऱ्यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गावर अनेक प्रलंबित प्रश्नांची सरबत्ती करीत उधळून लावली. सिडकोने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आजतागायत कोणत्याही प्रकारासाई पूर्तता केलेली नाही त्यामुळे सिडकोला लॉजिस्टिक पार्क करिता कोणत्याही स्थितीत या ठिकाणी नव्याने भूसंपादन करू देणार नसल्याचा इशारा या सभेत ग्रामस्थ्यांनी दिला आहे.
सिडकोच्या वतीने अनेक नवी गाजरे दाखवत उरणच्या चिरले , धुतूम आदी भागातील शेकडो एकर जमिनी संपादन करण्याचा घाट घालण्यात आला आहे . लाॅजिस्टीक पार्कच्या नावाने होऊ घातलेल्या या भूसंपादनासंदर्भात सिडको आणि शेतकरी, ग्रामस्थ यांच्यामधे एका जणसुनावणीचे आयोजन आज उरणच्या धुतुम ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. या जनसुनावणी बैठकीचे आयोजन धुतुम ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.रेश्मा ठाकूर व सदस्यांनी केले होते.
यावेळी सिडकोच्या वतीने भूसंपादन विभागाचे श्री. सतिशकुमार खडके. अप्पर जिल्हाधिकारी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी आणि प्रमदा बिडवे मॅडम. अति मुख्य भूमी व भूमापन अधिकारी आणि इतर सिडको अधिकारी, सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येनी शेतकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सिडकोच्या अधिकारी वर्गाकडून या नव्या लॉजिस्टिक पार्क संबंधातील प्रस्ताव काय आहे तो उपस्थितांनी समजावून घेतला आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी कोणताही गोंधळ न घालता अत्यंत मुद्देसूदपणे प्रश्न विचारून अक्षरशः सिडकोचे खडकेसाहेब आणि आधिकार्यांना भंडावून सोडले . यावेळी शेतकरी व ग्रामस्थ्यांनी सिडकोच्या फसव्या २२:५% च्या खोट्या पॅकेजला आपला कडाडून विरोध असल्याची भूमिका मांडली . सिडकोने साडेबारा टक्के देतानाही प्रत्यक्षात आम्हा शेतकऱ्यांना अवघे पाऊणेनऊ टक्केच प्रत्यक्षात दिले आहेत. त्यामुळे साडेबावीस टक्केची बात सिडको कडून मारली जात असली तरीही आम्हाला या प्रकल्पाला जमिनीच द्यायच्या नाहीत अशी ताठर भूमिका यावेळी उपस्थित शेतकऱयांनी एकमुखाने मांडली.
सिडको बाधीत अनेक गावांना सिडकोने आजतागायत कधीही गावठाण विस्तार योजना दिलेली नाही आणि सिडकोने गावठाणाबाहेरील घरांच्या जमिनीला नोटीसा काढल्या आहेत या नोटीसा सिडकोने बिनशर्त पाठीमागे घ्याव्यात तर आणि तरच चर्चेला या असा पवित्रा घेत विस्तारीत गावठाणक्षेत्रातील सर्व जमीन भूसंपादनातून वगळण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थ्यांनी केली . या गंभीर इशाऱ्यानंतर सिडकोच्य वतीनं उपस्थित श्री.खडकें यांनी विस्तारीत गावठाणक्षेत्रातील जमीन वगळण्यात येईल आणि यासंदर्भात आम्ही सिडकोचे एम डी यांच्य ही बाब निदर्शनास आणून निर्णय घेऊ असे अश्वासन दिल्यानंतर ही सभा सुरळीत चालली.

यावेळी ग्रामस्थांकडून प्रलंबित १२:५% चे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविण्यात यावेत , गावासाठी सिडकोकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आधी पुरविण्यात याव्यात ,अनेक शेतकरी सिडको विरोधात वाढीव भावाचे खटले जिंकले आहेत त्यांच्या वाढीव भावाचे पैसे सिडकोने त्वरित द्यावेत, नव्याने लॉजिस्टीक पार्क साठीचे भूसंपादन २०१३ च्या सुधारित कायद्यानुसार करण्यात यावे त्याचप्रमाणे रोजगार, नोकरी बाबत बोलतांना ग्रामस्थ्यांनी प्रकल्पातील ५०% कामे ही राजकीय पुढाऱयांना न देता फक्त त्याच मौजेतील बाधित शेतकऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीनेच मिळाली पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली , तसेच धुतूम परिसरातील सी आर झेड जवळील जमीनीचे सरसकट भूसंपादन करावे त्या कोणतेही कारण देऊन वगळण्यात येऊ नयेता कारण त्या जमिनी त्याच शेतकऱ्यांनी आज पर्यंत खाडीचे बांध बंधारे नियमित पणे बांधून पुढील जमिनीसी आर झेड मध्ये जाण्यापासून वाचविल्या आहेत अशा शेतकऱ्यांवर अन्या झाल्यास तो सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
त्याचबरोबर नियाज खात्याचे १२:५% चे भूखंड ३० वर्षांपूर्वीच मंजूर झाले परंतु सिडको ते प्लाॅट देण्यास टाळाटाळ करीत असेल व यामध्ये धुतूम गावातील हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचे भूखंड सुद्धा आहेत ते न देणार्या सिडकोचा जाहिर निषेध करून शेतकरी श्री. दत्तू भिवा ठाकूर यांनी प्लाॅट न मिळाल्यास सिडको भवनासमोर आत्मदहनाचा ईशारा यावेळी अधिकारी वर्गाला दिला.
या जनसुनावणीस सरपंच सौ.रेश्मा शरद ठाकूर, सदस्य शरद ठाकूर, सदस्य सदानंद ठाकूर,सदस्या वैशाली पाटील, सदस्या सौ आशा महेंद्र ठाकूर, माजी सरपंच धनाजीशेठ ठाकूर, डी.आर.ठाकूर, दत्तू भिवा ठाकूर, पुंडलिक गोपीचंद ठाकूर, माजी सरपंच सदानंद ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, संदेश ठाकूर(चिरले), ॲड.चंद्रकांत मढवी(चिरले), नंदेश ठाकूर, करण ठाकूर, संतोष पाटील ,चंदन ठाकूर, नामदेव भाई ठाकूर, दत्ता ठाकूर, आणि मोठ्या संख्येनी तरूण ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. या मीटिंग चे प्रास्थविक आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकूर यांनी केले.








Be First to Comment