मधुबन कट्टा जोशात बहरला.
कोकण मराठी साहित्य परिषद उरणचा उरण येथील मधुबन कट्टा आणि तेथे होणा-या कविसम्मेलनाच्या कार्यक्रमाची सुनियोजित १७ तारीख काहिशा मुक्त वातावरणात " सुनाई कविसम्मेलन " या रूपात मधुबन कट्टा पत्रकार गणेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली जोशात बहरला.यावेळी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, माजी नगराध्यक्ष
नागराजशेठ,कीर्तनकार एकनाथ पाटील, साहित्यिक अमृत पाटील इत्यादींची
प्रमुख उपस्थिती होती.कवयित्री सुनंदा के.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त
ऍड.डि.के.पाटील यांनी कविसंमेलन आयोजन केले होते.सूत्रसंचालन रंजना जोशी केणी यांनी सुरेख पद्धतीने केले.प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी सादर केले.
कवयित्रीच्या पुण्यतिथीनिमित्त
कविसम्मेलन घेऊन डी. के. यांनी संस्कारी पायंडा घातला आहे असा विचार आपल्या अध्यक्षीय भाषणात
पत्रकार गणेश कोळी यांनी मांडला.
कविसम्मेलनात अमृत पाटील.मच्छिंद्र म्हात्रे,रायगड भूषण किशोर पाटील, रंजना केणी,भ.पो.
म्हात्रे,संजीव पाटील, अजय शिबकर ,
संजय होळकर, चेतन भोईर,एकनाथ
म्हात्रे,संपदा पाटील, प्रा.अशोक खातू,
मनोज उपाध्ये,संजय ठाकुर, अनंता पाटील ,शिवप्रसाद पंडित ह्या २१ कवींनी
आई,निसर्ग, प्रेम,भक्ती,राजकारण, शेती इत्यादी विषयांवर कविता सादर केल्या.आभार मच्छिंद्र घरत यांनी
मानले.







Be First to Comment