….
श्रीनिवास काजरेकर
म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग मराठी माध्यमात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या चि. वेदांत पाटील ने रायफल शूटिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे.
अहमदाबाद येथे 8व्या वेस्ट झोन चॅम्पियन(प्री नॅशनल-सहा राज्याच्या rc पात्रता फेरी) 10 मी एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सब-युथ/युथ/जुनियर गटातून वेदांत किरण पाटील याने 400पैकी 380 गुण मिळवले असून भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी साठी त्याची निवड झाली. मुंबई येथील लक्ष्य शुटींग क्लब मध्ये तो ट्रेनिंग घेत असून भारतीय रायफल शुटींग टीम च्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती. सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे.
वेदांतची एकाग्रता, जिद्द आणि आत्मविश्वास यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा जगतातील नवा उगवता तारा म्हणूनही वेदांतकडे बघितले जात आहे. वेदांतच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय क्रीडेची देदीप्यमान परंपरा पुढे नेणारा हा रायफल शूटर येत्या काही वर्षांत नेत्रदीपक कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.







Be First to Comment