सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा नामदेव लोखंडे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५७ वर्षाचे होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते. ते आपला वीटभट्टी व्यवसाय सांभाळून सामाजिक कामात सक्रिय होते.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सोशल डिस्टन्सचा पालन करीत उपस्थित होते. त्यांच्या आकस्मित निधनाने कोलाड परिसरासह आंबेवाडी गावावर शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.२४/८/२१ रोजी तर उत्तर कार्य विधी शुक्रवार दि. २७/८/२१ रोजी त्यांच्या आंबेवाडी येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली असुन त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई,पत्नी १ मुलगा,१ मुलगी,२ भाऊ,पुतणे, सुना,नातु व मोठा लोखंडे परिवार आहे.








Be First to Comment